सारोळा नदी पात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला
पुणे-सातारा महामार्गालगत सारोळा गावच्या हद्दीत असलेल्या नीरा नदी पात्रात अनोळखी उतार वयीन इसमाचा मृतदेह सापडला आहे.ही घटना दि.१२ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.राजगड पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवार दी.१२ रोजी सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमी लगत असणाऱ्या नीरा नदी पात्रा मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती राजगड पोलीस स्टेशनला मिळाली असता घटनास्थळी पोहचत पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथील उपविभागीय रुग्णालयात पाठविले असता पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर मृतदेहाचे वर्णन,सडपातळ बांधा, रंग गहुवर्निय गोरा, वय ५५-६०, अंगावर पांढऱ्या रंगाचा पायजमा व हिरव्या पिवळ्या रंगाचा लाईनीचा शर्ट असे वर्णन आहे.तरी राजगड पोलीस स्टेशन ने आवाहन केले आहे अशा वर्णनाची कोणी व्यक्ती काही दिवसांपासून गायब असल्यास राजगड पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा. या घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येणाऱ्या किकवी चौकीचे पोलीस नाईक नाना मदने करीत आहेत.