लातूर जिल्ह्यातील फरार आरोपी पकडण्यास जेजुरी पोलिसांना यश…
जेजुरी परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे सर्व स्तरावर कौतुक
जेजुरी :- अहमदपूर पोलीस स्टेशन जिल्हा लातूर येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 577/23 भादवि कलम 394, 307…. मधील आरोपी शुभम प्रकाश जाधव राहणार अहमदपूर जिल्हा लातूर गेले दोन दिवसापासून जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत दौंडज खिंडीमध्ये पिंगोरी गावात त्याच्या नातेवाईकांच्या मदतीने शेतात राहत असल्याची गोपनीय माहिती जेजुरी पोलीस स्टेशनला मिळाली.
त्या अनुषंगाने काल दिनांक ९/१०/२३ रोजी दुपारपासून जेजुरी पोलीस स्टेशन स्टाफ च्या मदतीने सदर आरोपीचा शोध घेतला आसता त्यास आज सकाळी जेजुरी पोलिसांनी पिगोंरी येथुन ताब्यात घेतले असून त्यांने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे, तसेच या घटनेची माहिती जेजुरी पोलिसांनी अहमदपूर पोलिसांना दिली आहे.
सदर गुन्हयाची थोडक्यात माहिती –
सदर गुन्हयातील फिर्यादी अच्युत अशोकराव शेळके हे पिग्मी एजंट असून हे दिनांक ८/१०/२३ रोजी पिग्मी ची रक्कम गोळा करून घरी घेऊन जात असताना आरोपी यांनी त्यांच्या मोटरसायकलला मोटरसायकल आडवी मारून कोयत्याने वार करून त्यांच्याकडील एक लाख रुपये जबरी चोरीने चोरून नेले होते व गुन्हा करून आरोपी दोन दिवसांपासून जेजुरी येथे पिंगोरे गावचे आसपास लपून राहिलेले होता.
जेजुरी पोलिसांनी सदर आरोपी अहमदपूर पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
सदर ची कारवाई,
अप्पर पोलीस अधीक्षक आनंदा भोईटे साहेब, बारामती विभाग, तानाजी बरडे पोलिस उप अधिक्षक भोर विभाग सासवड व बापूसाहेब साडंभोर पोलिस निरीक्षक जेजुरी पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिस स्टेशन येथील पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे, पो.हवा.बनसोडे, पो.नाईक प्रशांत पवार, पो.शिपाई राहुल माने, पो.शिपाई योगेश चितारे यांच्या पथकाने केली आहे. या घटनेमुळे जेजुरी परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.