भोर मधे शोर्य जागरण यात्रेचे उत्साहात स्वागत
भोर :- ३५० वा शिवराज्यभिषेक दिन सोहळा व विश्व हिंदू परिषदेच्या षश्टयब्दीपूर्तीनिमित्त शिवनेरी ते सिंहगड शौर्य जागरण यात्रेचे आज मंगळवार (दि.१०) दुपारी १ वाजता भोर स्टँडवर आगमन झाले. यावेळी फुलांच्या उधळणीत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. किल्ले शिवनेरीहून निघालेली शौर्य जागरण यात्रा इंदापूर, बारामती, जेजुरी, सासवड वरून आज भोर मधे दाखल झाली. भोर स्टँड पासून निघालेली रॅली शिवतीर्थ चौपाटी पर्यंत मोठ्या उत्साहात नेण्यात आली. या वेळी शिवभक्तांनी फुलांची उधळण आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार करून स्वागत केले.
या याञेचा मुख्य उद्देश हिंदू धर्मात नवचैतन्य तसेच छञपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल तसेच लव्ह जिहाद बंदी, गोरक्षक संरक्षण, हिंदू धर्म वाढवणे असे प्रमुख उद्देश असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी दिली
तसेच ही याञा शिवनेरी पासून सुरू होऊन जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, काञज करून खडकवासला जवळील सिंहगड किल्ल्या पायथा येथे 14-10-2023 रोजी सांगता होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष गणेश आखाडे यांनी दिली.
यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हाध्यक्ष गणेश आखाडे , जिल्हा महामंञी हरिभाऊ देवकर, रथ सहकारी नानाभाऊ सावंत, गोरक्षक उमेशभैय्या म्हेञे,भिकोबा खेनट, विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री दादा वेदक,पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहधर्म प्रसार प्रमुख राजाभाऊ चौधरी, प्रताप चव्हाण तसेच भोर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक शंकरराव पाटील, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष संजयभाऊ भेलके, सिनेअभिनेते भूषण दादा शिवतरे, शिवभक्त सोमनाथ भाऊ ढवळे, उद्योजक कुणाल धुमाळ, विनायक काका सणस, गोरक्षक अक्षय पवार व मोठ्या प्रमाणात शिवभक्त उपस्थित होते.