बारामतीत जमीन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल…
बारामती : बारामतीतील चिमणशहा मळा पाटस रोड येथील इलेक्ट्रिक दुकान व्यावसायिक अशोक बस्तीमल आस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ४ मे २०१२ ते ५ ऑक्टोबर २०२३ या काळात अमोल सुरेश येवले या व्यक्तीने तांदुळवाडीतील गट क्रमांक १४३/२ मधील प्लॉट खरेदी करून देतो म्हणून १३ लाख ५० हजार रुपये नोटरी द्वारे स्वीकारले. त्यातील काही पैसे त्याने परत केले. परंतु १२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केली. पैसे मागितल्यावर जिवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद अशोक आस्वाल यांनी दिली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार ए.जे.जगदाळे करीत आहेत.