पुण्यात ६६ लाख रुपयांचा सायबर फ्रॉड करणाऱ्या आरोपींना सायबर पोलिसांनी थेट बिहार मधून केली अटक….
पुणे न्यूज : पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात लेखापाल म्हणून काम करत असणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईलवर फोन करून कंपनीचा संचालक बोलत असल्याचे सांगून मीटिंगमध्ये आहे तात्काळ रक्कम पाठवण्यास सांगितले, त्यानंतर अकाउंटंटने तात्काळ ६६ लाख ४२ हजार रुपयांचे ऑनलाइन पेमेंट केले. त्यांनी यानंतर मालकाला विचारणा केली असता हा घोटाळा झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सर्व प्रकार लक्षात येताच फिर्यदिने सायबर क्राईम पोलिसात धाव घेतली.सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुणे सायबर पोलिसांनी सदर घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना बिलाल शबिर अन्सारी (वय २१), कामरान इम्तीयाज अन्सारी (वय २३) दोघेही रा.सिवान,बिहार यांचा हात असल्याचे समजले. पुणे सायबर पोलिसांनी थेट बिहारमध्ये जाऊन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या कडे विविध कंपन्यांचे ३६ सिमकार्ड ८ मोबाईल फोन. १९ एटीएम कार्ड,गावठी कट्टा आणि आठ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.बँक खात्यांची चौकशी केल्यानंतर आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, हैदराबाद येथील फसवणूक प्रकरणातही आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार, उपायुक्त संदीप कामनिक, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.