विद्युत मंडळाच्या दोन ट्रान्सफॉर्मरमधून तब्बल १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या कॉपर कॉइलची चोरी; भोर तालुक्यातील निगडे व धांगवडी गावातील प्रकार

कापूरहोळ : विद्युत मंडळाच्या कार्यरत असणाऱ्या दोन ट्रान्सफॉर्मरमधून तब्बल १ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या कॉपरच्या कॉईलची चोरट्यांनी चोरी केली असल्याचा प्रकार निगडे व धांगवडी(ता.भोर) येथे घडला आहे. याबाबत महावितरणचे किकवी शाखेचे कर्मचारी कपिल यंशवत येवले(वय ३९ वर्ष, रा.किकवी, ता.भोर) यांनी रविवारी(दि. २६ मे)फिर्याद दिली आहे. याप्रकरणी राजगड पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडे(ता.भोर) व धांगवडी(ता.भोर) या दोन्ही गावांच्या हद्दीत विद्युत मंडळाचे ट्रान्सफॉर्मर बसविले असून येथुनच गावाला विजेचा पुरवठा होतो. अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही ट्रान्सफॉर्मरमधून चक्क १ लाख ५ हजार रुपये किमतीच्या २४० किलो कॉपरची कॉईल चोरून नेली असून दोन्ही डिपीवरील ट्रान्स्फॉर्मरच्या ऑईलचे टँक मध्ये असणारे काही लिटर ऑईल सांडुन नुकसान केले असल्याची फिर्याद कर्मचारी येवले यांनी दिली आहे. यापूर्वीही असे प्रकार भोर तालुक्यातील अनेक गावांत घडले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सदर घटनेचा अधिक तपास पोलीस अंमलदार गणेश लडकत करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page