भोर विधानसभा भाजपा प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या वतीने उत्रौली(भोर)येथे मोफत नेत्र चिकित्सा शिबिर…
भोर न्यूज : उत्रौली (ता.भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भोर विधानसभा भाजपा प्रमुख किरण दगडे पाटील यांच्या वतीने मोफत नेत्र चिकित्सा, चष्मा वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.किरण दगडे पाटील यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.शिबिरात ६१० रुग्णांची नेत्र तपासणी करून ५०४ जणांना चष्मांचे मोफत वाटप करण्यात आले.७८ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान झाले असून लवकरच त्यांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे आदर्श सरपंच अमर बुदगुडे यांनी सांगितले.या प्रसंगी तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, आदर्श सरपंच तथा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे , ॲड. कपिल दुसंगे ,संजय खरमरे, माजी कोषाध्यक्ष अशोक भागवत ,सचिन कन्हेरकर, संतोष लोहकरे ,दत्ता नवघणे ,भोर शहर भाजपा अध्यक्ष पंकज खुर्द ,निलेश कोंडे , वैभवकुमार साळवे, तालुका भाजपा महिला अध्यक्षा आशा शिवतरे ,पल्लवी फडणवीस, दिपाली शेटे ,स्वाती गांधी, लता अंबडकर समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.सुजाता पवार,वैजयंता शिवतरे, संदीप फडतरे, माई मेडिकल फाउंडेशन पुणेच्या डिम्पल सिन्हा, नर्गिस परविन,सन्नीकुमार जैस्वाल, रेश्मा सिन्हा,उपस्थित होते .