महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील रेशनिंग दुकानात आढळला चक्क प्लास्टिक चा तांदूळ…

पाचगणी : गरीब आणि गरजू व्यक्तींना दोन वेळचे जेवण मिळावे यासाठी सरकारमार्फत नागरिकांना मोफत रेशन पुरवले जाते. अशात रेशनमध्ये मिळत असलेले धान्य खराब असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. अनेक रेशन दुकानदार जास्त पैशांसाठी गोरगरिबांच्या वाटेला आलेलं धान्य ब्लॅकने विकतात. पाचगणी मधील शाहूनगर व गोडवली परिसरातील दोन रेशन धान्य दुकानातून विक्री करताना चक्क प्लास्टिक चा तांदूळ आढळला आहे. यामुळे ग्रामस्थांन मध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या तांदळात जास्त प्रमाणात रबरमिश्रित व प्लास्टिक तांदूळ असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी अजित शेंडे व तालुका पुरवठा अधिकारी श्रीमती गोसावी यांना या घटनेबाबत जाब विचारला आहे.या प्लास्टिक मिश्रित तांदळाची चौकशी पूर्ण होईपर्यंत वितरण थांबविण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा गंभीर प्रकार असून, जनतेच्या जीवाशी खेळले जात आहे.पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा तांदूळ शासनानेच पुरवला असल्याचे सांगून हा तांदूळ कुणी खावा व कुणी खाऊ नये या घटनेबाबत प्रेस नोट देवून घटनेला बगल दिली आहे. प्लास्टिक तांदूळ कसा ओळखावा. १)एका ग्लास पाण्यात एक चमचा कच्चा तांदूळ घालून ते विरघळवा. तांदूळ पाण्यावर तरंगू लागला तर समजून घ्या की हा तांदूळ खोटा आहे, कारण खरा तांदूळ किंवा दाणे पाण्यात टाकताच बुडतात.२)एका चमच्यावर थोडे तांदूळ घ्या आणि लाइटर किंवा मॅचस्टिकच्या मदतीने ते जाळून टाका. ढवळताना प्लास्टिक किंवा जळलेल्या तांदूळाचा वास येत असेल तर समजून घ्या की तांदूळ बनावट आहे.३)बनावट तांदूळ गरम तेलात टाकूनही ओळखता येतो. यासाठी तांदळाचे काही दाणे खूप गरम तेलात टाका. यानंतर भाताचा आकार बदलला किंवा भात स्वतःला चिकटू लागला तर काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page