जेजुरी पोलिसांचा वैश्या व्यवसाय करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील एका लॉज वर छापा…
जेजुरी : जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जेजुरी सासवड रस्त्यावर तक्रारवाडी जवळ असणाऱ्या लक्ष्मी नारायण लॉजवर अनैतिक वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली.त्यानुसार जेजुरी पोलिसांनी सोमवार (दि.१६) रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नारायण लॉजवर बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता येथील मॅनेजर व त्याचा कामगार दोन महिलांकडून संगनमताने वैश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले.पोलिसांनी व्यवसाय करवून घेणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार लॉजिंग मधील किचन कट्ट्याखाली गुप्त दरवाजा करून आतील बाजूस सदर वेश्या व्यवसाय अत्यंत गुप्त रीतीने सुरू होता. मात्र जेजुरी पोलिसांनी अत्यंत गुप्त पणे सदर चालू असणारा वेश्याव्यवसाय उघडकीस आणण्यात यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी रोख रक्कम व दोन मोबाईल जप्त केले आहेत.या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले असून जेजुरी पोलिसांनी रमा मुगवेर (वय २८ वर्षे), रुबी केशव देश भंडारी(वय २८ वर्षे) दोघेही राहणार.संदीप गार्डन रोड, बोलिंग ठाणे सध्या राहणार लक्ष्मीनारायण लॉजिंग ॲन्ड बोर्डींग,रेस्टॉरंट, तक्रारवाडी व परमेश्वर नागाप्पा शेट गुंडे (वय ३९ वर्षे) राहणार पांडुरंग गल्ली, वागदरी ता.अक्कलकोट यांच्यावर अनैतिक मानवी वेश्या व्यवसाय प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ सह भादवि क ३४ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.सदरची कारवाई ही पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलिस उपनिरीक्षक पुंडलीक गावडे, महीला पोलिस उपनिरीक्षक रुपाली पवार, पोलीस कर्मचारी गणेश नांदे, प्रविण शेंडे, गणेश गव्हाणे, योगेश चितारे, विनायक हाके यांनी केली.