“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” च्या गजरात नारायणपूर येथे दत्त जन्म सोहळा उत्साहात संपन्न
नारायणपूर : पुरंदर तालुक्यातील प्रसिध्द श्री क्षेत्र नारायणपूर येथे श्री. दत्त जन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मंदिरात लाखो भाविक, टाळ-मृदूंगाचा गजर, मंदिरात केलेली विविध रंगी फुलांची सजावट, ‘ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ‘ च्या गजरात, फुलांची उधळण करीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत पोपट महाराज टेंबे स्वामी यांच्या अधिपत्याखाली शनिवारी (दि. १४ डिसेंबर) सायंकाळी ७ वाजुन ०३ मिनिटांनी मोठ्या उत्साहात दत्त जन्म सोहळा पार पडला.
पहाटे दत्त मंदिर व नारायणेश्वर मंदिरात देवांना रुद्रभिषेक झाला. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यांत आली होती. दत्त जन्मा अगोदर पोपट महाराज टेंबे स्वामी यांचे दत्त जन्माचे आख्यान झाले. त्या नंतर फुलांचे वाटप, पाऴणा, नाव ठेवणे तसेच सुंठवडा वाटप हा कार्यक्रम झाला. यावेळी फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागताचा कार्यक्रम झाले.
यावेळी आमदार विजय शिवतारे, माजी आमदार उल्हास पवार, माजी आमदार अशोक टेकवडे, प्रांताधिकारी वर्षा लांडगे, जालिंदर कामठे, तात्यासाहेब भिंताडे , प्रशांत वाढेकर, प्रशांत पाटणे, बालासो भिताडे,दिलीप यादव,हरिभाऊ लोले,बबन टकले,एम. के. गायकवाड,उमेश गायकवाड,मंदिर व्यवस्थापक भरत क्षीरसागर,सरपंच प्रदिप बोरकर, रामभाऊ बोरकर, चंद्रकांत बोरकर, भोर उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, तहसिलदार विक्रम राजपूत ,पोलिस निरिक्षक ऋषींकेश अधिकारी, दादा भुजबळ, रामदास मेमाणे त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह, कलकत्ता, मध्यप्रदेश, दिल्ली, तामिळनाडू, तसेच देशाच्या विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.