भोर – न्हावी येथील जिल्हा परिषद शाळेतून फिल्टरच्या इन्व्हर्टरसह बॅटरीची चोरी
सारोळे : न्हावी (ता. भोर) येथील जिल्हा परिषद शाळा व न्यू इंग्लिश स्कूल या शाळांच्या पटांगणावर विद्यार्थ्यांसाठी बसवलेल्या सोलर वॉटर फिल्टर सयंत्रातील इनर्व्हटर व बॅटरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार मुख्याध्यापकांनी राजगड पोलिस ठाण्यात केली.
याबाबत जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संदिप संपत मोरे (वय ५१, रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये म्हटले आहे की, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ते ३ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान शाळेला सुट्टी असताना शाळेच्या मोकळ्या पटांगणावरील सोलर वॉटर फिल्टर सयंत्रातील इनर्व्हटर (अंदाजे किंमत १२ हजार) व बॅटरी (अंदाजे किंमत १८ हजार), असा मिळून तीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. याबाबत पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मयूर निंबाळकर पुढील तपास करत आहेत.