मुळशीत जिल्हा बँक करणार इंद्रायणी भाताची खरेदी
मुळशी : कोळवण (ता. मुळशी) येथील भैरवनाथ मंदिरामध्ये भात खरेदीसाठी आढावा बैठक आयोजित केली होती. जिल्हा बँकेच्या सात विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाचे विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हा बँक मुळशीत या हंगामापासून इंद्रायणी ची शेतकऱ्यांकडून २४ रुपये प्रती किलो बाजारभावाने खरेदी करणार आहे. येत्या १२ नोव्हेंबरपासून खरेदी सुरू होणार आहे. बँकेचे अधिकारी सुरेश नागरे यांनी भात खरेदी कशी होणार याचे प्रास्ताविक केले. बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी भात खरेदी योजनेबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला भात बँक मुळशी ॲग्रो या नावाने बाजारात विकणार आहे. प्रत्येक गावातील केंद्रावर शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्याची जबाबदारी संबंधित सोसायटीचे संचालकांवर व सचिवांवर देणार आहे.
या वेळेस यशवंत गायकवाड, पोपट भाऊ दूडे, भगवान शेठ नाकती, भरत सातपुते, धनंजय टेमघरे, बँकेचे अधिकारी बाबासाहेब ववले, सुरेश नागरे, माणिक भालेराव, सोपान निबुदे, प्रकाश फाले, गुलाब ओव्हाळ, राम साठे, काशिनाथ जाधव, लक्ष्मण दूडे, स्वप्नील टेमघरे, ज्ञानेश्वर जाधव, सुदाम धिडे, बबन मगर, सीताराम धिडे, पंढरीनाथ धिडे, ज्ञानोबा साठे, भाऊसाहेब टेमघरे, किसन मानकर, बाबूराव साठे, संजय साठे, संदीप जोरी उपस्थित होते.