बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी साडे आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील पारगांव(ता. खंडाळा जि. सातारा) गावच्या हद्दीत पुणे कडून साताराच्या दिशेने जाणाऱ्या बेकायदेशीर विदेशी दारु व बिअरची वाहतूक करणारी मारुती कंपनीची चारचाकी इको गाडी राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग राज्य उत्पादन शुल्क सातारा, तसेच भरारी पथक सातारा विभाग यांनी कारवाई करत जप्त केली. संकेत ज्ञानेश्वर यादव(रा. सटलवाडी, ता. पुरंदर) व गणेश विलास गुजर रा.शिर्के कॉलनी, शिरवळ ता. खंडळा) या दोन इसमांविरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर दोन्ही इसमांच्या ताब्यातून १ लाख ५२ हजार २४० रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली असून त्यामध्ये विदेशी दारु व बिअरचे विविध ब्रँडचे एकूण २२ बॉक्स होते. सदर गुन्हयात वाहनासह एकूण ८ लाख ५२ हजार २४० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

सदरची कारवाई ही लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारु विक्री व वाहतूकीवर गस्त घालत असताना डॉ. विजय सुर्यवंशी(आयुक्तसो, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई), प्रसाद सुर्वे(संचालक सो), विजय चिंचाळकर(विभागीय उपायुक्तसो) यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव वैद्य प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. विजय मरोड दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, सातारा हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page