पुणे-सातारा महामार्गावर निगडे (भोर) गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावर भारत पेट्रोलियम पेट्रोल पंपासमोर निगडे (ता.भोर, जि.पुणे) गावच्या हद्दीत पुणे कडे जात असणाऱ्या कारचा आज सोमवारी (दि. ८ जानेवारी) दुपारी २ वाजता अपघात झाला असून, कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे समजत आहे. या अपघातातील कार चालक अनिल उद्धव सूर्यवंशी (वय ४६ वर्षे, रा.परांजपे कॉलनी,पलूस,सांगली) यांस सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेण्यात आले असता कार चालक जागीच मयत झाला असल्याचे वृत्त आहे.
सदर अपघात हा कार चालवत असताना कार चालकास हृदय विकराचा तीव्र धक्का आला असल्याने झाला असल्याचे समजत आहे. सदर कार (एम एच १४ एफ एक्स ३०१०) ही मर्सिडीज कंपनीची आहे. सदर घटनेची माहिती राजगड पोलिसांना कळवली असून राजगड पोलीस घटनस्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.