भोर तालुक्यातील वेळू येथे घरासमोरून दुचाकीची चोरी
खेडशिवापुर : वेळु(ता.भोर)गावाचे हद्दीत शुक्रवार दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्री मोटार सायकल चोरीस गेल्याची घटना घडली. येथील पांडुरंग किसन पांगारे (वय ५१ वर्षे रा. वेळु फाटा ता. भोर) यांच्या राहत्या घराचे समोरून रॉयल एनफिल्ड कंपनीची ३५० सी. सी.(एम.एच.१२.एल.क्यु.७१७२)मोटार सायकल चोरीला गेली. मोटासायकल ची अंदाजे किंमत ८०,००० रू. आहे . कोणीतरी अज्ञात चोरटयाने ही मोटार सायकल चोरून नेली असल्याची कायदेशीर फिर्याद राजगड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली असून पोलिस अमंलदार काळे यांनी आज रविवार (२९ ऑक्टोबर) रोजी पांडुरंग पांगरे यांच्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरोधात कलम ३७९ अंतर्गत राजगड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार चव्हाण करत आहेत.