मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भोर तालुक्यातील किकवी येथे निघाला ‘कँडल मार्च’
किकवी : भोर तालुक्यातील बऱ्याच गावांमधून राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तालुक्यातील अनेक गावातून मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषणासह वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत. त्याच प्रमाणे किकवी गावातही मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ‘कँडल मार्च’ काढून त्यांना पाठिंबा देण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात आत्ता पर्यंत ज्या मराठ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांना भावपूर्ण आदरांजली यावेळेस वाहण्यात आली. रविवार (दि.३० ऑक्टोबर) रोजी किकवी येथे सायंकाळी ७ वाजता या ‘कँडल मार्च’ ला सुरुवात करण्यात आली. किकवी गावाच्या प्रवेशद्वारापासून पासून या ‘कँडल मार्च’ ची सुरुवात होऊन संपूर्ण गावातून हा मोर्चा निघून गावातील भैरवनाथ मंदिरात या ‘कँडल मार्च’ ची समाप्ती झाली.या वेळी मान्यवरांनी निवेदन व्यक्त करून या मार्च ची सांगता झाली.
विशेष म्हणजे किकवी गावातील सर्व समाजाचे बांधव या ‘कँडल मार्च’ मध्ये सहभागी झाले होते.या मोर्चावेळी लहानांपासून थोरांपर्यंत बहुसंख्येने सगळे उपस्थित होते. यात प्रामुख्याने किकवी गावचे सरपंच नवनाथ कदम, नवनाथ भिलारे, बाळासाहेब कोंढाळकर, उत्तमराव अहिरे,सुरेश अहिरे,चेतन कोंढाळकर,किरण घारे,नरेंद्र मोदी,मौलौद्दिन शेख,अक्षय अहिरे,तानाजी भिलारे, गणेश भिलारे,अभिमन्यू कोंढाळकर, गोपाळ कोंढाळकर,संभाजी पाटणे,संतोष कोंढाळकर,मनोहर चव्हाण, सागर घारे,बाप्पा घारे, डि.एम.अहिरे,सुभाष मांढरे,प्रशांत कोंढाळकर,संतोष सनस,नित्यानंद घारे,कपिल येवले,भगवान लेकावळे,स्वप्नील निगडे,गणेश लेकावळे ,वैभव भिलारे, अथर्व पाटणे,हर्षद जाधव,पृथ्वीराज कोंढाळकर, रामचंद्र घारे, प्रफुल्ल अहिरे,विश्वास निगडे,किशोर भिलारे,गणेश पाटणे, सागर भिलारे, हर्षद लाळे,दिनेश लाळे तसेच महिलांमध्ये उषा कोंढाळकर, सोनाली निगडे,राजश्री काकडे,सुनंदा भिलारे,लता येवले, दीपाली काकडे,स्वाती पाटणे, दिपाली अहिरे,रत्नमाला भिलारे, विमल अहिरे,प्रतिभा कबाडे आदी उपस्थित होत्या.