श्री क्षेत्र नारायणपूर मंदिरात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी
नारायणपूर : पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त रविवारी(दि. २१ जुलै) विविध कार्यक्रमांचे आयोजनाने गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्व भावीक भक्तांना संपूर्ण गुरु पुजन व दर्शन ऑनलाईन घडवल्यामुळे हजारो भविक मंत्रमुग्ध होऊन गेले.
श्री क्षेत्र नारायणपुरात आज पहाटे दत्तमहारांजाच्या पादुकांना रुद्र अभिषेक घालण्यात आला. तर मूर्तिची पूजा व मंदिरात फुलांची व विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली. दरम्यान, आज मंदिर पहाटेपासूनच दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. सकाळी साडे नऊ वाजता नेहमीची आरती करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. तर सकाळी साडे अकराला गुरु पूजेची तयारी करून गुरूंच्या पूजेसाठी सुरुवात झाली. त्यानंतर आरती करून दत्तमहारांजाचा “दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” चा जय घोष करण्यात आला. त्यानंतर दुपारी दत्त सेवेकरी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. पोपट महाराज स्वामी यांच्या हस्ते पादूका पूजन झाले. त्यानंतर दत्त सेवेकरी मंडळाच्या वतीने सद्गुरू नारायण अण्णा महाराज यांचे पूजन नारायणधाम निसर्गोपचार केंद्र येथे नारायणधामचे प्रमुख डॉ. उदयकुमार डोंगरे यांच्या दक्षतेखाली झाले.
यावेळी आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार उल्हास पवार, विश्व्हिंदू परिषदेचे मंत्री वेदकदादा पाठक, एम. पी. चे आमदार पायीतल मेटाजी, सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे यांच्या हस्ते पादुकांना फुले वाहून पूजा करण्यात आले. यावेळी नारायणपूर गावचे सरपंच प्रदीप बोरकर, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, चंद्रकांत बोरकर, अजित बोरकर, दादा भुजबळ, बबनराव टकले, दिनकर सरपाले, भाजपचे सासवड शहर उपाध्यक्ष अमोल जगताप, नितीन झेंडे, अनिल उरवणे, सासवडचे माजी नगरसेवक संतोष गिरमे, संभाजी जगताप, ग्रामसेवक रोहित अभंग आदी मान्यवर व भाविक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.