पुणे-सातारा महामार्गावर हॉटेल सुर्या समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
किकवी : पुणे-सातारा महामार्गावर किकवी(ता.भोर) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शशिकांत ज्ञानोबा मोरे(वय ३६ वर्ष, रा. मोरवाडी, ता. भोर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ज्ञानोबा मारूती मोरे(वय ७० वर्ष,रा. मोरवाडी, ता. भोर) यांनी याबाबत राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी(दि. २२ एप्रिल) रात्री १२:१५ च्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावर किकवी(ता.भोर) गावच्या हद्दीतील हॉटेल सूर्या समोर रस्ता ओलांडत असताना मोरवाडीतील युवक शशिकांत मोरे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच राजगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजगड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन भोर उपविभागीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. अज्ञात वाहन चालक हा शशिकांत मोरे यांच्या मृत्युस कारणीभुत असून अपघाताची खबर न देता निघुन गेल्याबद्दल त्यांचे वडील ज्ञानोबा मोरे यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक अजित पाटील करीत आहेत.