जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव, लिलावासाठीची वाहने पाहणीसाठी उपलब्ध

सातारा : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्या अंतर्गत जप्त केलेल्या १२ वाहनांचा जाहिर ई-लिलाव प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आला असून, सदर वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथील आवारात व इतर ठिकाणी दि. ८ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२३ दरम्यान कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत.

जाहिर ई- लिलावात एकूण १२ वाहने उपलब्ध आहेत. यात टुरीस्ट टॅक्सी-८ व डी. व्हॅन (३w) – ४ अशा वाहनांचा समावेश आहे. ई- लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहिल, याची संबंधीत वाहन मालकांनी नोंद घ्यावी.

Advertisement

ई- लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिलदार सातारा, वाई, माण, कोरेगाव, महाबळेश्वर, खटाव, कराड, खंडाळा, महाड, आणि जावळी तसेच प्रादेशिक कार्यालय सातारा यांच्या सूचना फलकावर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आलेली आहेत. इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा व इतर ठिकाणी करता येईल. जाहिर ई- लिलावात सहभागी होण्यासाठी ८ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये www.eauction.gov.in यासंकेत स्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल. ऑनलाईन नाव नोंदणी झाल्यानंतर दि. २० नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथे खटला विभागात सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत नावनोंदणी फि रु ५०० आणि रु.१ लाख रक्कमेचा डी.डी. प्रत्येक एका लॉटसाठी व लिलावातील प्रत्येक एका वाहनासाठी रु. ५०० प्रमाणे होणारा एकत्रित रक्कमेचा DY RTO SATARA या नावे अनामत रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट सह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती, नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी, अप्रुव्हल करुन घेणेसाठी सादर करणे गरजेचे आहे.
लिलावाचे अटी व नियम बुधवार दि. ८ नोव्हेंबर पासून कार्यालयीन कामकाजादिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा येथील नोटीस बोर्डवर सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत उपलब्ध राहील. सदर वाहने जशी आहेत तशी या त्तवावर जाहिर ई लिलावाद्वारे विकली जातील. असे कराधान अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,सातारा यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page