राजा रघुनाथराव विद्यालय भोर येथे आधुनिक संगणक प्रयोगशाळेच्या फर्निचर निर्मितीचा शुभारंभ
भोर : राजा रघुनाथराव विद्यालय ही भोर तालुक्यातील नामांकित शाळा असून सतत विद्यार्थीहित लक्षात घेऊन कार्य करत असते. म्हणूनच ४० विद्यार्थी बसतील एवढी मोठी संगणक प्रयोगशाळा असताना त्यांनी ६० विद्यार्थी बसतील अशी आधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारत आहे. या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यात होवून ते तंत्रस्नेही बनतील असे मत डॉ. सुरेश गोरेगावकर यांनी व्यक्त केले.
कोरोनानंतर शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल झाले. मोबाईल आणि संगणक जीवनाचा अविभाज्य भाग बनले. बदलत्या काळाप्रमाणे पावले टाकणं गरजेचं आहे हे ओळखून भोर एज्युकेशन सोसायटीच्या राजा रघुनाथराव विद्यालयामध्ये एक अत्याधुनिक संगणक प्रयोगशाळा उभारण्यात येत आहे, या संगणक प्रयोगशाळेच्या फर्निचर निर्मितीचा शुभारंभ आज गुरुवार (१६ नोव्हेंबर) रोजी करण्यात आला.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन प्रमोद गुजर, व्हाईस चेअरमन, सुरेश देवी, सेक्रेटरी विकास मांढरे, सुरेशभाई शाह, डॉ. सुरेश गोरेगावकर, डॉ. प्रदीप पाटील , गजानन झगडे तसेच ज्यांनी या संगणक प्रयोगशाळेसाठी मदतीचा हात पुढे केला ते एम. एम. रंकाळे , मनिषा देशपांडे , अनिता धुमाळ, प्राची लाळे, माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर खोपडे, निहार शेख, मुख्याध्यापक एल. एम. भांगे, मोहन ताकवले, आनंदराव वीर, पर्यवेक्षक सुरेश देशमाने, निलीमा मोरे उपस्थित होते. मुख्याध्यापक एल. एम. भांगे यांनी यावेळेस प्रास्ताविक केले आणि सुरेश देशमाने यांनी आभार मानले.