माण तालुक्यातील खुन प्रकरणातील आरोपी अखेर पोलीसांच्या ताब्यात
सातारा (प्रतिनिधी) : पर्यंती ता.माण येथील दोन महिलांचा खुन करुन पसार झालेल्या आरोपींना पकडण्यात अखेर म्हसवड पोलीसांना यश आले असुन याप्रकरणी पोलीसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी हे मध्यप्रदेशातील परसिंधी करोल येथील रहिवाशी असल्याचे समोर आले असुन दोन्ही आरोपींनी सदरच्या खुनाची कबुली पोलीसांसमोर दिली आहे.
याबाबत म्हसवड पोलीसांकडुन समजलेली अधिक माहिती अशी पर्यंती (ता. माण) येथील श्रीमती नंदाबाई भिकु आडपाडकर (वय ५८वर्षे) व श्रीमती संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५वर्षे) या दोन्ही मायलेकींचा २० डिसेंबर च्या मध्यरात्री अज्ञातांनी गळा आवळुन खुन केल्याची घटना घडली होती. या दुहेरी खुनाने संपूर्ण सातारा जिल्हा हादरुन गेला होता, सदर खुनाचा उलगडा पोलीसांकडुन लवकर होत नसल्याने सोशल मिडीयावर कमेंटही होत होत्या मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत पोलीसांनी जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींचा शोध अतिशय गोपनीय पध्दतीने सुरु ठेवला होता, पोलीसांनी या तपासकामी श्वानाचीही मदत घेतली मात्र ती फारशी कामी आली नाही तरी ही पोलीसांनी एक आव्हान समजुन याप्रकरणाचा छडा लावण्याची मोहीम हाती घेतली होती, अशातच पोलीसांना त्यांच्या खबर्यांकडुन पर्यंती गावातील दोन जेसीबी चालक हे खुनाच्या घटनेपासुन बेपत्ता असल्याची खबर लागली त्यावेळी पोलीसांनी याबाबत अतिशय गोपनीयता बाळगत बेपत्ता असलेल्या जेसीबी चालक संदिप शेषमल पटेल ( ३० ) व त्याचा साथीदार अजितकुमार रामकिशोर पटेल (२९ ) रा.दोघेही परसिंधी करोल ( मध्यप्रदेश )या दोघांची संपूर्ण माहिती काढली. या दोघांनीच खुन केला असल्याची खात्री झाल्याने त्यांनी याबाबत जिल्हा पोलीस उपअधिक्षक ऑचल दलाल, उप विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांना याची माहिती देत वरिष्ठ पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांची वेगवेगळी पथके तयार करुन संबधित आरोपींना थेट त्यांच्या गावातुन ताब्यात घेत सातारा येथे आणले त्यांच्याकडुन पोलीसांनी कसुन चौकशी केली असता त्या दोन्ही आरोपींनी आपण मयत नंदाबाई व संपताबाई यांच्याकडुन पैसे व सोन्याचे दागिण्यासाठी त्यांचा गळा आवळुन खुन केला असल्याची कबुली पोलीसांसमोर दिली, आरोपींनी खुनाची कबुली दिल्याने पोलीसांनी त्यांना तात्काळ अटक करीत या प्रकरणाचा छडा लावत खुन्याच्या गुन्ह्याचा उकल केला असुन पोलीसांचे याकामी पोलीस अधिक्षक समीर शेख यांच्या कडुन अभिनंदन करण्यात आले.
सदरची कारवाई सातारा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव, शिवाजीराव विभुते, सपोनि म्हसवड पोस्टे, सपोनि सुधीर पाटील, रव्रिद भोरे, पोउनि पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, अनिल वाघमोडे, फॉरेन्सिक विभागाच्या सपोनि रुपाली मोरे, स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार सुधीर बनकर, संतोष सपकाळ, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, लैलेश फडतरे, अमोल माने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, अमित माने, अविनाश चव्हाण, मोहन पवार, ओंमकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सांवत, पृथ्वीराज जाधव, मयुर देशमुख, स्वप्नील कुंभार, विक्रम पिसाळ, धिरज महाडीक चालक शिवाजी गुरव सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे, फॉरेन्सीक विभागाचे राजीव कुंभार, मोहन नाचण तसेच म्हसवड पोलीस स्टेशनचे रवि डोईफोडे, अमर नारनवर, शामराव वाघमारे, शिवाजी जाधव, अभिजीत बहाद्दले, नवनाथ शिरकुळे, यागेश सुर्यवंशी, धिरज कवडे, जगन्नाथ लुबाळ, भागवत बनसोडे, रुपाली फडतरे, मैना हांगे, यांनी केली आहे.