शरद पवार साहेब यांच्यावर टीका केल्यामुळे नामदेवराव जाधवांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळ
पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यावर सातत्याने टीका करणाऱ्या नामदेव जाधव यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळं फासण्यात आलं आहे. पवारांवर सतत टीका केल्यामुळे जाधवांविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यातील येरवडा परिसरातील भांडारकर संस्थेच्या कार्यक्रमासाठी नामदेव जाधव पोहचले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे नामदेव जाधव यांचे पुढचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.