पुणे जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत समावेश; भोरचाही समावेश तर वेल्हे, मुळशीस वगळले

पुणे : पुणे जिल्ह्यात यापूर्वी केंद्राच्या निकषानुसार बारामती, पुरंदर हे दोन तालुके पूर्णतः, तर इंदापूर, शिरूर आणि दौंड तालुक्यांत अंशतः दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांचा दुष्काळाच्या यादीत मुळशी, वेल्हे हे दोन तालुके वगळता भोरसह अन्य सर्व तालुक्यांमधील महसूल मंडळांचा समावेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळी म्हणून घोषित झाले आहेत.

दुष्काळ जाहीर केलेल्या ठिकाणी ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, अशा गावांचा समावेश करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीच्या तुलनेत ७५ टक्के कमी पाऊस झाल्याने या गावांना टंचाईसदृश म्हणजेच दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

मावळातील तळेगाव दाभाडे. भोरमधील भोर, संगमनेर, वेळू, किकवी. खेडमधील वाडा, आळंदी, चाकण, पाईट, कडूस, कनेरसर. पिंपळगावतर्फे खेड, राजगुरुनगर, आंबेगावातील मंचर, पारगाव, कळम, घोडेगाव. जुन्नरमधील निमगाव सावा, बेल्हे, वडगाव आनंद, नारायणगाव जुन्नर या मंडळांचा समावेश आहे. यासह पुणे शहर, हवेलीतील खेड शिवापूर, उरुळी कांचन, थेऊर, खडकवासला, वाघोली, हडपसर, कळस, चिंचवड आणि भोसरी या महसूल मंडळांचाही दुष्काळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Advertisement
भोर तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली होती की भोर ला दुष्काळ जाहीर करावा. तसेच आम्ही चुकीचे निकष पाठवले असाही भोर मधील शेतकऱ्यांचा गैरसमज होता. तसे नसून शासनाने पहिल्या टप्प्यात जाहीर केलेल्या तालुक्यात भोर चा समावेश केला नव्हता. यामुळे भोर मधील शेतकरी वर्ग नाराज झाला होता. परंतु नंतर शासनाने निर्णय घेऊन तीन टप्प्यात दुष्काळ जाहीर केला. त्यात तीव्र दुष्काळ, मध्यम दुष्काळ, कमी दुष्काळ असे तीन प्रकार केले. शासनाने तीव्र दुष्काळामध्ये पहिले तालुके घेतले तर ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या मध्यम दुष्काळामध्ये भोर च्या चार महसूल मंडळांचा समावेश केला. त्यात भोर, संगमनेर, वेळू, किकवी या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे.
     -भोर तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page