पुणे नगर रस्त्यावर टँकर उलटून वायुगळती
पुणे : पुणे नगर रस्त्यावर वडगाव शेरी चौकाजवळ टँकर उलटून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली आहे. पीएमआरडीए आणि पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे ८ बंब घटनास्थळी दाखल झाले असून वायुगळती थांबबविण्याचे काम सुरू आहे. मोठया प्रमाणात आग आणि स्फोट होण्याचा धोका आहे. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स कंपनीचे तंत्रज्ञ तेथे पोहोचेपर्यंत टँकरवर पाण्याचा मारा करण्यात येत आहे. नगर रस्त्यावर वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.