संगमनेर वि.का. सोसायटीच्या अध्यक्षपदी शशिकला गोरड तर उपाध्यक्षपदी शहाजी गाढवे
कापूरहोळ : संगमनेर(ता.भोर) विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सोमवारी(दि २ सप्टेंबर) झालेल्या निवडणुकीत सोसायटीच्या अध्यक्षपदी शशिकला निवृत्ती गोरड तर उपाध्यक्षपदी शहाजी तानाजी गाढवे यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भोर चे सहाययक निबंधक बाळासाहेब तावरे आणि सहकारी संजय पवार यांनी कामकाज पाहिले.
संगमनेर, माळवाडी या दोन्ही गावाची ही एकत्रित सोसायटी आहे. मागील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त जागी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अविरोध निवडणूक सहाय्यक निबंध कार्यालय भोर येथे पार पडली. संस्थेचे सदस्य काँग्रेस पक्षाचे विचार धारा समर्थक आहेत. अध्यक्ष व उपाध्यक्ष पदी निवड प्रसंगी सदस्य राजेंद्र गव्हाणे, बबनराव बांदल, शांताबाई बांदल, रखमाबाई आखाडे, दिनेश नेवसे, नितीन नेवसे, परशूराम बांदल, नितीन बांदल, संतोष गोरड, माऊली बांदल, सिद्धार्थ गोरड तसेच सोसायटी सचिव भरत शिंदे आदी उपस्थित होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष शशिकला गोरड म्हणाल्या कि, शासनाच्या विविध योजना सर्व शेतकऱ्यांना पोहचवून आगामी काळात संस्थेचे कामकाज संपूर्ण संगणकिकृत करून पारदर्शकपणे करणार आहे.