सोलापूर येथील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भोरमधील भोंगावलीतील युवा मल्लांची उत्कृष्ट कामगिरी
भोर : भारत सरकार द्वारा मान्यताप्राप्त स्टेअर्स फाउंडेशन राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा २०२३-२०२४ केगाव, सोलापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. दिनांक एक, दोन,तीन डिसेंबर रोजी या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा पार पडल्या. सदर कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भोंगवली गावचा नवोदित मल्ल पैलवान ओमकार ताटे हा १७ वर्ष वयोगटाखालील ५१ किलो वजन गटांमध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. तसेच पैलवान पृथ्वीराज संग्राम भोसले हा ६५ किलो वजन गटांमध्ये द्वितीय तर ४८ किलो वजन गटामध्ये पैलवान साई भोसले याने तृतीय क्रमांक मिळवला. या सर्वांना भोंगवली गावचे वस्ताद पै.नितीन शिरगावकर यांचे प्रमुख मार्गदर्शन मिळाले असल्याचे मल्लांनी या वेळेस सांगितले.त्याचप्रमाणे सदर राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण सांघिक विजेतेपद मिळाले असल्याचेही यावेळेस सांगण्यात आले.