महावितरणच्या तारांची चोरी करताना साथीदार टॉवरवरून खाली पडला, मग काय निर्दयी साथीदारांनी त्याला तिथेच डोंगरात पुरला; राजगड(वेल्हे) तालुक्यातील घटना

राजगड : महावितरणच्या टॉवरच्या तारांची चोरी करण्यास गेलेल्या तिघांपैकी एकाचा टॉवर वरुन पडून मृत्यू झालेल्या साथीदाराचा मृतदेह इतर दोन साथीदारांनी डोंगरात पुरून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार राजगड(वेल्हे) तालुक्यात रात्रीच्या सुमारास समोर आला असून दुर्गम पाबे घाटात पोलिसांसह रेस्क्यू टीम दाखल झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी बसवराज पुरंत मॅगिनमनी(वय २२ वर्ष, सध्या रा. वडगाव बु. पुणे मुळ रा. तोळजुर, ता.अक्कलकोट, जि.सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव असून हा तरुण बेपत्ता असल्याची फिर्याद सिंहगड रोड पोलीस ठाण्यात २३ जुलै दाखल करण्यात आली होती.

Advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बसवराज मॅगिनमनी हा रुपेश अरुण येनपुरे, सौरभ बापू रेणुसे(वय २५ वर्ष, दोघेही राहणार पाबे, ता. राजगड) यांच्या सोबत रांजणे(ता.राजगड) या ठिकाणी असलेल्या महावितरणच्या टॉवरची तांब्याची वायरची चोरी करणेसाठी गेला असताना, सदर ठिकाणी बसवराज मॅगिनमनी हा टॉवरवर चढुन एक्साब्लेडने वायर कापत असताना, वायर कापुन तो टॉवरवरुन खाली पडुन, जखमी होवुन मयत झाल्याने त्यास रुपेश अरुण येनपुरे, सौरभ बापू रेणुसे यांनी पाबे घाट(ता. राजगड, जि. पुणे) येथील डोंगरात खड्डा काढून गाडले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून पोलिस व रेस्क्यू टीमचे सदस्य घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास वेल्हा पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे राजगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page