सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी आमदार सुनील शेळकेंनी कसली कंबर; महायुतीच्या बुथ कमिटीच्या मेळाव्याला भोरमध्ये उपस्थिती

भोर : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असून याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी गावभेट दौरा आणि प्रचार सभेचा तडाखा लावला आहे. या दरम्यान महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बुथ कमिटी आढावा बैठक व मेळावा मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी(दि. १६ एप्रिल) भोर-महाड रोडवरील सह्याद्री मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी आमदार सुनील शेळकेंनी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी कंबर कसल्याचे दिसून आले. या मेळाव्यासाठी भोर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

आमदार शेळके यांनी यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व राष्ट्रीय समाज पक्षाच्या सर्व बुथ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलले की, महायुतीच्या घटक पक्षांनी आपापसात समन्वय ठेवून जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. तसेच महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी बुथ कमिटी सदस्यांनी प्रभावीपणे काम करावे. बुथ कमिटीचा प्रमुख हा मतदार व पक्ष यांमधील समन्वय साधणारा दुवा असतो. महायुतीचा सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आपल्या बुथवरील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी बुथ कमिटी महत्त्वाची भूमिका बजावत असते हे लक्षात ठेवून प्रत्येकाने काम करावे. तसेच प्रचारादरम्यान व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बुथ कमिटीच्या कोणत्या जबाबदाऱ्या असतात या समजून घेऊन नियोजनबद्ध बुथ कमिट्यांची बांधणी समन्वय ठेवून सर्वसमावेशक पद्धतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

या बैठकीस रणजित शिवतरे, भालचंद्र जगताप, चंद्रकांत बाठे, विक्रम खुटवड, संतोष घोरपडे, जीवन कोंडे, सचिन घोटकुले, अमोल पांगारे, अमर बुदगुडे, केदार देशपांडे, समीर घोडेकर, कुणाल धुमाळ, स्वप्नील गाडे, अतुल काकडे, बाळासाहेब गरुड, संतोष गायकवाड, बाळासाहेब शेटे, हृषिकेश गायकवाड, तेजस मोरे, प्रशांत पवार तसेच बुथ कमिटी सदस्य व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page