वांगणीवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शिवसेना (उ.बा.ठाकरे) गटाच्या मनिषा अंकुश चोरघे यांची बिनविरोध निवड
वेल्हा : वांगणीवाडी (ता.वेल्हा, जि.पुणे) येथे सोमवार दिनांक (११ डिसेंबर) रोजी सरपंच पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये सरपंच प्रमिला ऋषिकेश वाडघरे, उपसरपंच कल्पना पांडुरंग बिऱ्हामणे, ग्रा. पं. सदस्य सुशीला विठ्ठल वाडघरे, रोहिणी संजय बोबडे, प्राची किरण वाडघरे व गणेश सुनिल चोरघे यांनी सर्वानुमते मनीषा अंकुश चोरघे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड केली. निवडणूक प्रक्रिया अधिकारी राजपाल यादव, मदतनिस रवी गायकवाड व वैभव आल्हाट यांनी हि निवडणूक पार पाडली.
यावेळी सरपंच मनिषा अंकुश चोरघे यांनी सांगितले की सर्व ग्रामस्थ व मतदारांच्या सोबतीने गावाचा सर्वांगीण कायापालट करण्यासाठी मी वचन बध्द आहे, माझे पती शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे गावात आणणार आहे. यावेळी शिवसेना मा. तालुकाप्रमुख दत्तात्रय देशमाने व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ग्रामसेवक बी. बी. कल्याणकर, मा. सभापती आकाश वाडघरे, दिगंबर चोरघे, शिवाजी (आबा) चोरघे, विजय चोरघे, भरत (आण्णा) चोरघे, करण चोरघे, अविनाश चोरघे, जितेंद्र वाडघरे, साहेबराव चोरघे, संतोष भाऊ चोरघे, ऋषिकेश वाडघरे, अंकुश दादा चोरघे, कांता वाल्हेकर, अंकुश वाल्हेकर, पांडुरंग बिऱ्हामणे, अंकुश चोरघे, कृष्णा चोरघे, कैलास चोरघे, भागुजी चोरघे, संतोष चोरघे, विनोद वाल्हेकर, तानाजी बिऱ्हामणे, किरण चोरघे, मंगेश चोरघे आणि ग्रामस्थ व तरुणमंडळ उपस्थित होते.