सारोळा नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला
सारोळा : पुणे-सातारा महामार्गालगत सारोळा गावच्या हद्दीत असलेल्या नीरा नदी पात्रात अनोळखी इसमाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना मंगळवार (दि.१९ डिसेंबर) रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.१९ डिसेंबर) रोजी सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमी लगत असणाऱ्या नीरा नदी पात्रा मध्ये एका व्यक्तीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली आहे. सदर इसमाचे वय ३० ते ३५ वर्षे असण्याची शक्यता आहे त्याच्या अंगावर काळया रंगाचा शर्ट व काळया रंगाची नाइट पँट आहे. याबाबत राजगड पोलीसांशी संपर्क करून माहिती दिली असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.