मोरवे येथे दत्तजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
खंडाळा : श्रीदत्त जयंती निमित्त श्री क्षेत्र मोरवे येथे श्री दत्त मंदिर संस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीदत्त मंदिर संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
आज रविवार दि. २४ रोजी सकाळी ६.०० वा. श्रीदत्त प्रभू व चिले महाराजांना अभिषेक व आरती सकाळी ९.३० वा. सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा प्रारंभ दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ६.३० वा. आरती व नंतर भजन सोहळा. सोमवार दि. २५ डिसेंबर दत्तप्रभू व चिले प्रभुंना महाअभिषेक व आरती व त्यानंतर गुरुचरित्र पारायण सुरू सायंकाळी आरती नंतर ओम दत्त चिले ओम भजनी मंडळ मोरवे यांची भजन सेवा. दि. २६ रोजी दत्त जयंती दिवशी पहाटे ५ ते ९ श्रींना महारुद्र अभिषेक सकाळी १० वा. श्री गुरुचरित्र, चिले महात्म्य, शिवलीलामृत पारायण सांगता होणार आहे. सकाळी ११ वा. महाआरती करून श्रीदत्त प्रभू यांची फुलांनी सजवलेल्या रथातून ग्राम प्रदक्षिणा सायंकाळी ६ वा. श्रीदत्त जन्म सोहळा व पाळणा आणि विविध भजनी मंडळाचे भजन सेवा आणि नंतर महाप्रसाद होणार आहे.