राजगड(वेल्हा) तालुक्यातील पुणे येथील रहिवासी मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
पुणे : भोर-राजगड(वेल्हा)- मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजगड(वेल्हा) तालुक्यातील नोकरी, व्यवसायानिमित्त पुणे शहरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचा संवाद मेळावा शनिवारी(दि. १९ ऑक्टोबर) राधाकृष्ण गार्डन मंगल कार्यालय(कात्रज-नवले पूल रस्ता, आंबेगाव बु.) येथे संपन्न झाला. यावेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे व आमदार संग्राम थोपटे यांच्या विचारांशी बांधिलकी असलेल्या राजगड तालुक्यातील नागरिकांनी या मेळाव्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली पाहायला मिळाली. यावेळी संग्राम थोपटे यांनी नागरिकांशी तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी राजगड तालुक्यातील ५० कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तसेच यादरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
या प्रसंगी वेल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अध्यक्ष संतोष रेणुसे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानासो राऊत, पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश टापरे, नगरसेवक बाळासाहेब धनकवडे, काका चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव धरपाळे, अमोल नलावडे, मा.सभापती दिनकरराव सरपाले, सीमाताई राऊत, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक डॉ.संभाजी मांगडे, संदीप नांगीने, महिला अध्यक्षा आशाताई रेणुसे, भोर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल पडवळ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे जिल्हा युवती अध्यक्ष दुर्गा चोरघे, वेल्हा तालुका युवक अध्यक्ष प्रमोद लोहकरे, काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष शिवराज शेंडकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह कार्यकर्ते, राजगड(वेल्हा)तालुक्यातील पुणे स्थित रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.