इनाम जमिनीच्या विक्रीप्रकरणी शिरूर तालुक्यात २८ जणांवर गुन्हे दाखल

शिरूर : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे बोगस माणसे उभी करुन संगनमताने गट नंबर ४२१ मधील जमिनीच्या व्यवहारातील इनाम वर्ग ६ ब (महारवतन) ही जमिन विक्री केल्याप्रकरणी २८ आरोपींवर फसवणूकप्रकरणी घोडनदी न्यायालयाच्या १५६/३ आदेशानुसार शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

२००९ मध्ये फिर्यादी अलका धोंडीराम कांबळे यांना वडिलांच्या मृत्युनंतर वारसा हक्काने जमिन गट नंबर ४२१ ही त्यांच्या नावे झाली आहे. मात्र, सदर जमिनीचा व्यवहार करताना आरोपी प्रविण मनिलाल संघवी, बिपीन राजमल गुंदेचा, विलास चांगदेव पंचमुख यांनी फिर्यादी अलका कांबळे ऐवजी सपना गणेश पंचमुख, रेखा घनशाम मुळे ऐवजी शितल निलेश पंचमुख व भागुबाई नवा पंचमुख ऐवजी सईबाई शिवाजी शेलार यांना उभे करुन खोट्या सह्या व अंगठे घेऊन २८ एप्रिल २०१० रोजी दुय्यम निबंधक कार्यालय तळेगाव ढमढेरे येथे दस्त क्रं. २३८७/ २०१० मधील लिहून देणार व घेणार अशा सर्व आरोपींनी एकमेकांशी आर्थिक देवाणघेवाण करुन अलका कांबळे व शासनाची फसवणूक केली आहे. फिर्यादीच्या सह्याही खोट्या आहेत.

Advertisement

हे प्रकरण दडपण्यासाठी यातील आरोपी सुवर्णा जयराम डोळस यांनी प्रवीण संघवी, बिपीन गुंदेचा, विलास पंचमुख यांच्याविरोधात २०१७ साली फौजदारी तक्रार दाखल केली. आरोपी दीपक संघवी याने साठेखतावरुन खरेदीखत करुन द्यावे, असा कोर्टात अर्ज करुन फिर्यादी अलका कांबळे यांची छळवणूक चालू होती. त्यामुळे अलका कांबळे यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक व शिरुर पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दिली. पोलिसांनी फौजदारी कायदेशीर न केल्यामुळे फिर्यादीने न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाने अलका कांबळे यांच्या फिर्यादीची दखल घेत गुन्हे दाखल केले आहेत. पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय जगताप हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page