रांजणगाव येथील पतसंस्थेतील कर्मचारी पतीने पत्नीशी झालेल्या किरकोळ वादातून पत्नी व मुलाला विषारी औषध पाजून स्वतः केली आत्महत्या

रांजणगाव : पत्नीशी झालेल्या किरकोळ भांडणातून तरुणाने पत्नी व पोटच्या ६ वर्षीय मुलाला विषारी औषध पाजत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. ५ जानेवारी २०२४ रोजी घडली.

घटनेत गजानन भाऊ रोकडे (वय ३५ वर्षे), पौर्णिमा गजानन रोकडे (वय ३४ वर्षे), दुर्वेश गजानन रोकडे (वय ६ वर्षे, सर्वजण सध्या रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर जि. पुणे) यांचा मृत्यू झाला आहे. रांजणगाव गणपती येथील पतसंस्थेत ते दोघेही नोकरीला होते. या घटनेतून ९ वर्षांची चैत्राली गजानन रोकडे ही बचावली असून, तिच्यावर नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

दि. ५ जानेवारी रोजी गजानन भगवान रोकडे हे पत्नी पौर्णिमा, मुलगी चैत्राली व मुलगा दुर्वेश, उदापूर येथून श्रीरामपूरकडे जाण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले असता, रस्त्यातच पती-पत्नीचे भांडण झाले, त्यामुळे गजानन याने त्याची पत्नी पौर्णिमा, मुलगा दुर्वेश व मुलगी चैत्राली यांना त्याच्याकडील ड्रममधील विषारी औषध बळजबरीने पाजले, त्यानंतर मुलगा दुर्वेश यास पाण्याच्या डबक्यामध्ये फेकून दिले तर पत्नी पौर्णिमा हीस साडीने गळफास देऊन ठार मारले व स्वतः देखील साडीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर यांच्यासह सहाय्यक फौजदार संदीप गायकवाड करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page