स्वराज्यभूमी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेले भाटघर येथील रक्तदान शिबिर संपन्न
भोर : स्वराज्यभूमी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत श्री गणेश तरुण मंडळ भाटघर व श्री शिवप्रतिष्ठाण हिंदुस्तान यांच्या वतीने भाटघर (ता.भोर, जि.पुणे) येथे आज रविवार (दि. ७ जानेवारी) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी दहा वाजता अक्षय ब्लड बँकेचे पदधीकारी महेश रणदिवे, अभिजित अरनकल्ले आणि डॅा. पुजा दहीफोडे यांच्या हस्ते शिवरायांच्या चरणी पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. ह्या वर्षातील स्वराज्यभुमी प्रतिष्ठानचे हे पहीले रक्तदान महासंकल्प अभियान असून लोकांमधे रक्तदानाबाबत जनजाग्रुती व्हावी या हेतूने स्वराज्यभुमी प्रतिष्ठानने मागील वर्षीच्या रक्तदान महासंकल्प अभियानात वाठार, कारी आणि आंबवडे या तिन गावांत शिबिर आयोजित केले होते.
आज भाटघर (ता. भोर) येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. गावातील लग्नसमारंभामुळे लवकरच शिबिराचे काम संपविन्यात आले असल्याचे प्रतिष्ठान च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या शिबिरास विशेषतः हर्षद वीर, विशाल पन्हाळकर, राजेद्र वीर, युवराज जेधे, नितीनजी कुडले, संदिपजी खाटपे, सकेंत धनावडे, स्वप्नील दळवी, शुशांत झुनगारे, मंगेश विर व भाटघर ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच श्री गणेश तरून मंडळ यांनी अक्षय ब्लडबँक व स्वराज्यभुमी प्रतिष्ठान यांचे आभार मानले. स्वराज्यभुमी प्रतिष्ठान आयोजित करत आसलेले रक्तदान शिबीरे व त्या माध्यमातून होत असलेली जनहितार्थ मदत याचे उपस्थितांनी कौतुक केले.