धक्कादायक! अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्यामुळे बायकोचा छळ केल्या प्रकरणी वाईतील प्रसिद्ध सराफ व्यावसायिकावर गुन्हा दाखल
सातारा(प्रतिनिधी) : पतीचे एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला असल्याचा प्रकार वाई येथे घडला आहे. याप्रकरणी वाई पोलीस ठाण्यात एका सराफ व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. २३ ऑक्टोबर २०२३ पासून दि. ८ जानेवारी २०२४ या कालावधीत घडली आहे.
याप्रकरणी वाई शहरातील सिध्दनाथवाडी येथील नीलम वैभव धामणकर (वय ३५ वर्षे) या विवाहितेने वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सराफ व्यावसायिक असलेल्या पती वैभव भास्कर धामणकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नीलम धामणकर यांचे पती वैभव धामणकर यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध आहेत. या संबंधास नीलम यांनी विरोध केला असता, या कारणावरून पती वैभव आणि त्याची मैत्रिणी दोघांनी विवाहितेचा वर नमूद केलेल्या कालावधीत वारंवार छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. सदर घटनेचा पुढील तपास वाई पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार भोईर करीत आहेत.