पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे व पी.एम.आर.डी संचालक रमेशबाप्पू कोंडे यांच्या उपस्थितीत भोर-वेल्हे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक संपन्न
नसरापूर : पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे आणि पुणे शहर प्रमुख रमेश बाप्पु कोंडे(पी.एम.आर.डी संचालक) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये भोर-वेल्हे तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक सोमवार (दि.५ फेब्रुवारी) रोजी सकाळी १२ वाजता पुणे-सातारा महामार्गालगत असणाऱ्या चिंतामणी हॉटेल(केळवडे, ता.भोर) येथे संपन्न झाली. सदर आढावा बैठकीचे आयोजन युवासेना भोर तालुका प्रमुख स्वप्नील गाडे आणि शिवसेना भोर तालुका प्रमुख दशरथ जाधव यांनी केले होते. यावेळी बाळासाहेब चांदेरे यांनी सर्व शिवसैनिकांना, युवासैनिकांना, पदाधिकारींना पक्षवाढी संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच रमेश बाप्पु कोंडे यांनी यावेळेस बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हि सामान्य जनतेच्या नेहमी पाठीशी उभी आहे. भोर-वेल्हे तालुक्यातील गावा-गावांत सर्वत्र शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे असे पदाधिकाऱ्यांना त्यांनी यावेळेस आदेश दिले.
या बैठकी प्रसंगी पुणे जिल्हा महिला प्रमूख कांताताई पांढरे, युवासेना पुणे जिल्हाप्रमुख निलेश घारे, युवासेना उपजिल्हा प्रमुख सोमनाथ कुटे, भोर विधानसभा प्रमूख गणेश मसुरकर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. तसेच यावेळी वेल्हा तालुका प्रमुख सुनील शेंडकर, युवासेना उपतालुका प्रमूख अक्षय सणस, युवासेना उप तालुका प्रमुख प्रसाद घोडेकर, विद्यार्थी सेना प्रमुख भोर तालुका दत्ता गाडे, विशाल पवार, निखील गाढवे, गोपाल गाडे, प्रथमेश बाठे, विक्रम चाळेकर, ऋषिकेश मोरे, यश बदक, अमित बागडे, शुभम शिंदे आणि बरेच शिवसैनिक उपस्थित होते.