पुणे शहरात मोठी कारवाई : तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने जप्त; टेम्पो ताब्यात

पुणे : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आचारसंहिता सुरू असल्याने पोलिसांची ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. पुण्यातील सहकारनगर परिसरात शुक्रवारी(दि. २५ ऑक्टोबर) सकाळी नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एका टेम्पोतून तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने जप्त केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने सापडल्यामुळे खळबळ माजली आहे.

सोने आहे कुणाचे?
पुणे शहरात नाक बंदी केली जात असून यावेळी सातारा रोडवर सहकार नगर येथे पोलिसांनी एमएच ०२ ईआर ८११२ टेम्पोची तपासणी केली. त्यामध्ये 138 कोटी रुपयांचे सोने सापडले. आता हे सोने कोणाचे आहे? ते सोने कोठून आले? हे सोने कुठे जात होते? त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की, आम्ही सध्या कागदपत्रे तपासत आहोत. सध्या आयकर विभाग आणि निवडणूक आयोग चौकशी करत आहे.

Advertisement

ते सोने खासगी कंपनीचे
पोलिसांनी जप्त केलेले सोने हे खाजगी कंपनीच असल्याची माहिती मिळत आहे. या सोन्याबाबत कागदपत्रे देण्यास ती कंपनी तयार आहे. हे सोने घेऊन टेम्पो मुंबईवरून पुण्यात आला होता. यावेळी निवडणुकीमुळे पुण्यात नाकाबंदी सुरु असताना त्यात सोने सापडले. आता आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाला कागदपत्र कंपनीने मेले केले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा टेम्पो एका खासगी लॉजिस्टिक कंपनीचा आहे.

याबाबत पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सातारा रोडवर तपासणी सुरु होती. त्यावेळी टेम्पोमध्ये दागिणे असलेले पांढऱ्या पोत्यांमध्ये बॉक्स सापडले. यामध्ये तब्बल 138 कोटी रुपयांचे सोने होते. पोलिसांनी हे सोने जप्त केले असून टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page