भोर येथील पीर बाबा दर्गाच्या बांधकामाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक; काम बंद न केल्यास २२ जानेवारीला दर्गा पाडण्याचा जिल्हाध्यक्ष संतोषआप्पा दसवडकर यांचा इशारा
भोर : भोर शहरातील वेताळ पेठ या ठिकाणी चालू असलेले गैबी पीर बाबा दर्गाचे काम बंद करण्याबाबतचे निवेदन आज शुक्रवारी (दि. १९ जानेवारी) महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने भोर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, दिवाणी व फौजदारी न्यायाधीश भोर, भोर तहसीलदार आणि भोर पोलीस स्टेशन यांना देण्यात आले. यावेळी मनसे पुणे जिल्हाध्यक्ष संतोषआप्पा दसवडकर, मनसे वेल्हा तालुकाध्यक्ष दिगंबर चोरघे, दत्ता शेंडकर, विकास भिकुले, रवींद्र घाडगे, अशोक चोरघे तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर निवेदनात म्हंटले आहे की, भोर शहर वेताळ पेठ या ठिकाणी तालुका कोर्टाची जागा आहे. कोर्टाच्या जागेमध्ये गैबी पीर बाबा दर्गाचे काम चालू आहे. सदर दर्गाचे बांधकाम हे भोर नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांना न विचारता काम चालू केले आहे. जागेबाबत हिंदू समाजातील लोकांचे असे म्हणणे आहे की, सदर जागा ही नाथ बाबांची जागा आहे. त्या ठिकाणी हिंदू लोक दर गुरुवारी आरती करत होते. त्या जागेवर मुस्लिम लोकांनी अतिक्रमण करून त्या ठिकाणी पीर बांधला आहे. सदर ठिकाणी मुस्लिम लोकांनी दगड ठेवून पीर बनवण्यात आला होता. कोर्टाने ती जागा तसेच मोकळी ठेवली होती, आता त्या जागेवर तिन्ही बाजूने भिंत बांधून दर्गाचे काम चालू करण्यात आले आहे. तरी या ठिकाणी सुरु असलेले काम ताबडतोब थांबविण्यात यावे. येथील सुरु असलेल्या कामावर कायदेशीर कारवाई करुन येथील पीर बाबा दर्गा पाडुन टाकावा. अन्यथा येत्या २२ जानेवारीला राममंदीर उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील पीर बाबा दर्गा पाडण्यात येईल. असे या निवेदनात म्हंटले आहे.