रामलल्लांच्या आगमनानिमित्त कापूरहोळ येथील जय महाराष्ट्र हॉटेल मधील सुप्रसिद्ध धाराऊ मिसळ श्री राम भक्तांसाठी आज मोफत; वीर धाराऊ माता गाडेपाटील यांचे वंशज अमित गाडे पाटील यांचा स्तुत्य उपक्रम
कापूरहोळ : आयोध्या येथे निर्माणाधीन राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज २२ जानेवारी रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर आयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा साजरा होत असून तब्बल ५०० वर्षानंतर प्रभू श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा होत आहे. यानिमित्ताने सबंध देशामध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे. प्रभू श्री राम हे हिंदू धर्माचे श्रध्दास्थान आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी साजरी केली जात असून भोर तालुक्यात देखील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा होत आहे.
प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कापूरहोळ(ता.भोर) येथील छत्रपती शंभू राजेंच्या दुधाई माता वीर धाराऊ माता गाडेपाटील यांचे वंशज अमित गाडे पाटील यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. त्यांनी आज सोमवारी संपूर्ण दिवसभर पुणे-सातारा महामार्गावरील हॉटेल जय महाराष्ट्र येथे श्री राम भक्तांसाठी सुप्रसिद्ध अशी धाराऊ मिसळ खाण्यासाठी मोफत ठेवली आहे. तरी परिसरातील श्री राम भक्तांनी या मिसळचा आस्वाद घ्यावा.