अक्षयशक्ती वेलफेअर असोसिएशन ठाणे यांचेवतीने न्हावी केंद्रातील जिल्हा परिषद शाळा व इतर शाळांना, गरजू विद्यार्थ्यांना ७००० वह्यांचे वाटप

कापूरहोळ प्रतिनिधी : मंगेश पवार

Advertisement

भोर न्यूज : न्हावी(ता.भोर) सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शालेय वह्या व दप्तरे मिळावी यासाठी अक्षय शक्ती वेल्फेअर असोसिएशन ठाणे यांच्यावतीने मुलांना वही वाटप करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत अक्षय शक्ती वेल्फेअर असोसिएशन ठाणे हे दरवर्षी ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागातील शाळांमध्ये वह्या वाटप करतात. प्रथमच भोर, पुरंदर, सातारा या तालुक्यात चालू केले आहे. भोर तालुक्यातील न्हावी,पेंजळवाडी,टापरेवाडी, गुनंद,भोंगवली,भाबवडे, राजापूर,पांडे, तसेच पुरंदर तालुक्यातील हनुमान वस्ती व दौंडज तर सातारा जिल्ह्यातील बिचकुले देऊर या सर्व शाळेतील मुलांना वह्या वाटप करण्यात आले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला होता, या उपक्रमाचे नंतर एका चळवळीत रूपांतर झाले या चळवळीला भोर तालुक्याने भरभरून प्रतिसाद दिला. शैक्षणिक राजकीय अध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आव्हान या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व शिक्षक वर्गाने सर्वांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला. यापुढे असेच तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहन देण्यासाठी अक्षय शक्ती वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी अक्षयशक्तीचे गणेश काळे,संजय देठे,उमेश राजोरिया,राहुल डोळस प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.पुणे जिल्हा समन्वयक अनिल चाचर,रुपाली पिसाळ (चाचर) यांनी विशेष प्रयत्न केले.
न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका लाडे मॅडम यांनी उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी उर्मिला दत्तात्रय कारळे,सरपंच न्हावी ३२२,भरत सोनवणे, सरपंच न्हावी १५,शितल सोनवणे, श्री.सचिन सोनवणे अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती न्हावी, अजित शिंदे मा. सरपंच,सचिन यादव,रजनीकांत सोनवणे,शरद सोनवणे,निलेश बोन्द्रे, दिपक सोनवणे,प्रमोद सोनवणे,यांचे विशेष सहकार्य लाभले.यावेळी मोठया संख्येने शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल चाचर,सूत्रसंचालन विद्या भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपाली पिसाळ (चाचर) यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page