पुणे पोलिसांकडून भाई, दादांचा होणार करेक्ट कार्यक्रम; अमितेश कुमार यांनी आखला ‘हा’ नवा प्लॅन

पुणे : पुण्यामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढतंय. या गुन्हेगारीला वचक बसविण्यासाठी पोलीस दल आता चांगलंच ॲक्शन मोडमध्ये आलंय. नुकतंच काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्त पदाचा भार अमितेश कुमार यांनी स्वीकारला आहे. त्यानंतर त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवायला सुरूवात केली आहे.

पुणे पोलिसांची आता गुन्हेगारांवर गुप्त नजर असणार आहे. पुणे पोलीस दलात क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट स्थापन करण्यात येणार आहे. पुणे पोलीस दलातील गुन्हे शाखा आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांना एकत्रित करत करण्यात येणार आहे. त्यासाठी या नव्या युनिटची स्थापना केली जात असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. याअगोदर त्यांनी सलग दोन दिवसांची गुन्हेगारांची परेड घेतली होती. यामागे गुन्हेगारीमुक्त शहर बनवणे आणि कायदा मोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा देणे, हा उद्देश होता. या उपक्रमामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल लक्षणीयरित्या उंचावलं आहे.

Advertisement

तसेच पुणे पोलीस आता गुन्हेगारांची डिजिटल कुंडली काढणार आहे. प्रत्येक गुन्हेगाराचं सोशल मीडिया अकाउंट पुणे पोलीस सातत्याने तपासणार आहेत. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पुणे पोलीस दलाची कारवाई सुरू आहे. क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट शहरातील गुन्हेगारांवर गुप्तपणे नजर ठेवून असणार आहे. त्यामुळे परिणामी पोलिसांना सर्व माहिती मिळत राहील.

नुकत्याच झालेल्या शरद मोहोळ हत्या प्रकरणामुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या अनुषंगाने कुख्यात गुंडांवर कारवाई करण्याचे आणि गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page