मुळशी तहसिलदार रणजित भोसले यांनी आवारातील शासकीय कर्मचाऱ्यांची खाजगी वाहने हटवण्याचे दिले आदेश; कर्मचाऱ्यांची धावपळ
मुळशी : मुळशी तहसिल कार्यालय आवारात लावण्यात आलेल्या महसूल कर्मचारी, पोलीस कर्मचारी, नागरिकांनी बिनधास्तपणे लावण्यात आलेली खाजगी वाहने लावू नये, याबाबत तहसिल कार्यालयात येताना ‘नो पार्किंग’ बॉर्ड आणि कार्यालय आवारात मा.तहसीलदार मुळशी, पोलीस निरीक्षक पौड मुळशी तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी व लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, सदस्य यांच्या वाहना शिवाय अन्य कोणतेही वाहन परवानगी शिवाय आत सोडण्यात येणार नाही, असा फलक लावण्यात आलेला आहे.
तरीसुद्धा बिनधास्तपणे रोज वाहने लावण्यात येत होती. आज मंगळवार असल्याने नागरिकांना भेटण्याचा तहसिलदार यांचा दिवस त्यामुळे नागरिकांची गर्दी होती. तहसिल आवारात वाहनांमुळे नागरिकांना चालण्यास व उभे राहण्यास अडथळा निर्माण होत होता. ही बाब प्रत्यक्ष तहसिलदार रणजित भोसले यांच्या निदर्शनास आली असता तात्काळ संबंधित अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना आपली वाहने काढण्यास सांगितले. तसेच यापुढे तहसिल कार्यालय आवारात वाहने लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
तहसिलदार रणजित भोसले यांनी अचानक आवारात लावण्यात आलेली खाजगी वाहने काढण्यास सांगितल्याने महसूल अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्या खाजगी वाहने आवारातून हटवण्यासाठी धावपळ झाली आणि लगेच सर्वांनी आपली वाहने कार्यालया बाहेर लावली हे सर्व नागरिकांनी समक्ष झाल्याने तहसीलदार यांच्या कामाचे कौतुकाची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.