बारामती तालुका राज्यात एक नंबर बनवेल, मला तुमची साथ हवी – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती : बारामती शहर राज्यासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्याच हातात आहेत. बारामतीच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही. असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. बारामतीच्या विकासाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे कौतुक करत त्यांना पाठबळ दिले.

अजित पवार बोलताना म्हणले की, मी फुशारकी मारत नाही, पण बारामतीतील प्रत्येक इमारत बांधून पूर्ण होईपर्यंत मी चाळीस- चाळीस वेळा भेटी दिल्या. करायचं तर एक नंबर करायचं नाहीतर आपण त्याच्या नादाला लागत नाही. राज्यातील विकासकामे करताना मी मनापासून ती कामे करतो. बारामतीला राज्यातील सर्वात विकसित तालुका करायचा असून त्यासाठी आपली साथ हवी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमो मेळाव्यातून केले. बारामतीत ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री उदय सामंत, शरद पवार, सुप्रिया सुळे, दत्ता भरणे उपस्थित होते. ज्या विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी केली ते सर्वजण यावेळी उपस्थित होते.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांनी शड्डू ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सूचक विधान केल्याची चर्चा आहे. अजित पवार म्हणाले की, बारामतीमध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री आल्याने त्यांचे स्वागत करतो. मुख्यमंत्री कोकणातील कार्यक्रमासाठी गेल्याने थोडा उशीर झाला. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. नमो रोजगार विभागवार घेतला, त्याला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. बारामती तालुका एक नंबरचा करण्यासाठी राज्यातील नेते साथ देतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बारामतीमध्ये आज आणि उद्या ३ मार्च रोजी पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील उमेदवारांसाठी हा भव्य मेळावा होत आहे. या मेळाव्यसाठी आजपर्यंत ३४७ आस्थापना सहभागी झाल्या आहेत. त्यांच्याकडून ५५ हजार ७२ रिक्तपदे अधिसूचित करण्यात आली आहेत. तर आतापर्यंत ३३ हजारांवर युवक-युवतींनी रोजगारासाठी नावनोंदणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page