भारतीय अर्थव्यवस्थेला गेली ४८ वर्ष गंडवणारा हा खरा तेल लावलेला पैलवान
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : तेल लावलेला पैलवान कोण? तर साहजिक काही जण शरद पवारांच नाव घेतील. काहीजण देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा उल्लेख करतील. राजकारणात प्रत्येकाच्या नजरेत आपआपल्या ठिकाणी तेल लावलेला पैलवान आहे, याबद्दल काही शंका नाही. पण आपण आज एका अस्सल तेल लावलेल्या पहिलवानाबद्दल जाणून घेणार आहोत. कारण या माणसाने, भारतातल्या नियमांचा अचूक फायदा घेतला आहे. ते पण किती वर्ष तर गेली ४८ वर्ष. गेली ४८ वर्ष तो सांगून गंडवतोय तरिही त्याला कोणी पकडू शकलेलं नाही. ते व्यक्ती म्हणजे पॅराशूट तेल बनवणाऱ्या मैरिको कंपनीचे मालक हर्ष मारीवाला.
त्याचं कारण देखील तितकचं भन्नाट आहे. एक काम करा. तुमच्या घरात पॅराशूट तेलाची बाटली असेल. त्या बाटलीवर हेअर ऑईल अस लिहलय का बघा. तुम्हाला कुठेही त्या निळ्या बाटलीवर हेअर ऑईल अस दिसणार नाही. त्यावर फक्त कोकोनट ऑईल असा उल्लेख आहे. दूसरी गोष्ट खाण्यासाठी ज्या प्रमाणे व्हेज नॉनव्हेजसाठी हिरवा आणि लाल रंगाचा लोगो असतो तसा लोगो देखील यावर दिसेल. प्युअर व्हेजचा लोगो या बाटलीवर आहे. म्हणजे काय तर तुम्ही डोक्याला लावता ते तेल केसांना लावायचं नसून ते खाद्यतेल आहे. आत्ता मुद्या येतो अस का आणि ही काय भानगड आहे.
त्याचे मुख्य कारण म्हणजे, खाद्यतेलावर आत्तापर्यन्त कर नव्हता. त्यामुळे खाद्यतेल स्वस्त:त विकून चांगला फायदा मिळवता येत होता. पण हेच तेल ब्युटी प्रॉडक्ट म्हणून विकलं तर मात्र त्याला मोठ्या प्रमाणात कर द्यावा लागणार होता. म्हणून मारीवाला यांनी कोकोनट ऑईल हे खाद्यतेल म्हणून विकण्यास सुरवात केली. १९७५ पासून पॅराशूटची बाटली खपू लागली. हळुहळु घरतली मोक्याची जागा तिने मिळवली. पॅराशुटची निळी बाटली नसणारं घरं सापडणं मुश्किल झालं. भारतासोबत वेगवेगळ्या देशात ते आपलं तेल विकू लागले. कंपनीने चांगल नाव कमावलं. या दरम्यान पॅराशुटची जाहिरात सुरू झाली. मात्र काळजीपुर्वक जाहिरात पाहिल्यानंतर लक्षात येईल की कोणत्याही जाहिरातीतील महिला तेल घेवून ते केसांना लावताना दिसत नाही. एकीकडे महिला दूसरीकडे बॉटल. हा त्या महीलेचे केस लांबसडक असायचे मात्र ती कुठेही हे तेल डोक्याला लावा अस सांगायची नाही.
मध्यंतरी कोणीतरी कंपनीची तक्रार केल्याची माहिती इंटरनेटवर मिळते.
पण यात चुकीचं काय आहे. आम्ही खाद्यतेलच विकतोय आत्ता त्याचं काय करायचं ते ग्राहक ठरवतील. त्यामुळे कंपनीचे मालक कुठल्याही नियमांचा भंग करत नाहीत. थोडक्यात काय तर हा माणूस अस्सल तेल लावलेला पैलवान आहे ते यामुळेच. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात स्वयपाक करण्यासाठी देखील खोबरेल तेल वापरतात. ते थेट पॅराशूटची बाटलीच वापरतात. आपल्याकडे हे तेल डोक्याला लावतात. साधारण ८० टक्के लोकं खोबरेल तेल डोक्याला लावण्यासाठीच वापरतात. आणि कंपनी चांगला फायदा घेते. मैरिको कंपनीचा सध्या २४ देशांमध्ये व्यवसाय सुरू आहे. विशेष म्हणजे हर्ष मारीवाला हे भारतातल्या पहिला ५० श्रीमंतांच्या यादीत येतात. ते ही कोणतीही लबाडी न करता फक्त अक्कलहूशारी करून.