अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वेल्हे बुद्रुक येथील नराधमाला अटक; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
राजगड : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून वेल्हे पोलिसांनी अटक केली आहे. विशाल उर्फ सोन्या दत्तात्रय कोंढाळकर (वय २० वर्ष, रा. पवारमाळ, वेल्हे बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून न्यायालयाने त्याला ३ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्च रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राजगड तालुक्यातील एका गावातील भात खाचरातील झाडाखाली हा प्रकार घडला. आरोपी विशाल कोंढाळकर याने पिडित बालिकेच्या अज्ञातपणाचा फायदा घेवुन तिला जबरदस्तीने ओढत झाडाखाली आणले. तेथे तिच्या अंगावरील कपडे अर्धवट काढुन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केले. मोबाईल मध्ये व्हिडिओ शुटींग केले. हा प्रकार कोणास सांगितल्यास व्हिडिओ तुझ्या पप्पांना व आत्याला दाखवण्याची धमकी दिली. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आप्पासाहेब पडळकर अधिक तपास करत आहेत.