श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन मेळावा संपन्न
भोर : आंबवडे(ता. भोर) येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे १९९८-९९ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक संपन्न झाला सदर मेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी त्याकाळातील निवृत्त शिक्षक श्री एस एस शिवतरेसर होते. तत्कालीन शिक्षक आर. बी. बारदेसकर, एस. बी. सावंतसर, बी. ए. पाटील, एन. ए. दाभोळे, एच. डी. सावंत, माळी सर व शाळेचे मुख्याध्यापक थोपटे सर उपस्थित होते.
या मेळाव्यानिमित्त विद्यार्थ्यांनी शाळेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची छोटी मुर्ती भेट दिली. शाळेच्या दुरूस्तीसाठी या बॅचने मदत करावी असं आवाहन मुख्याध्यापक सुनील थोपटे यांनी केल्यावर त्याला ९९ च्या बैचने सकारात्मक प्रतिसाद दिला व येत्या काही दिवसात निधी उभा करून शाळेच्या छत दुरूस्तीचे काम सुरु करू असा शब्द दिला. तसेच तत्कालीन शिक्षक बी. ए. पाटील यांनी लागलीच शाळेच्या छत दुरूस्तीसाठी पाच हजार रुपये रोख स्वरूपात दिले त्या बद्दल विध्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला व आभार मानले.
“शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत असल्याचे पाहुन समाधान वाटले. तसेच आयुष्यात आई वडिलांची सेवा करा, थोरा मोठ्यांचा मान राखा, गुरूजनांना विसरू नका, अहंकार बाळगु नका. एकमेकांचा आदर करा” अशा भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केल्या. तसेच भोर वेल्ह्याचे माजी आमदार व आंबवडे गावचे भाग्यविधाते कै संपतराव अण्णा जेधे असताना शाळा खुप प्रगत होती मात्र आता शाळेची अवस्था पाहुन दुःख वाटत आहे अशी खंतही शिक्षकांनी यावेळी व्यक्त केली, तसेच शाळेच्या मदतीसाठी आम्ही कायम तत्पर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सदर स्नेहसंमेलनासाठी तुकडी अ व ब मधील ५४ मुले हजर होती. काही दिवंगत विध्यार्थी व शिक्षकांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विध्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना २५ वर्षांनंतर भेटुन खुप आनंद वाटला. जुन्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांना भेट स्वरूपात गुरु शिष्याची प्रेरणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज व तुकाराम महाराज यांची भक्ती-शक्ती मुर्ती भेट देण्यात आली. सर्व मुलांना आठवण म्हणुन सन्मान चिन्ह देण्यात आले.
सदर मेळाव्यासाठी पंकज मानकुंबरे ,योगेश खोपडे, पांडुरंग जेधे, विक्रम जेधे, कविता खोपडे, कविता घारे, मिनल जोशी, शरद शेडगे, विनायक शेडगे, ज्ञानेश्वर झुनगारे, गणेश घोरपडे, शिवाजी मोहिते व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले प्रास्ताविक व सुत्रसंचालन पंकज मानकुंबरे यांनी केले तर आभार संदीप कोंढाळकर व पांडुरंग जेधे, रेश्मा वर्टे यांनी आभार मानले. स्नेहभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.