बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असेल; विजय शिवतारेंचा अजित पवारांना शब्द

सासवड : गोष्टी घडत असतात, विसरायच्या असतात, मतभेद झाले हरकत नाही, मनभेद नको. गावागावात ८०-९० टक्के मतदान सुनेत्रा पवारांच्या घड्याळ चिन्हावर झालं पाहिजे. मोदींना झालं पाहिजे. बारामतीच्या विजयात सिंहाचा वाटा पुरंदरचा असेल. पुरंदरची जनता मोठ्या प्रमाणात लीड सुनेत्रा पवारांना देतील हा शब्द विजय शिवतारेंनी सासवडच्या महायुतीच्या मेळाव्यात दिला.

विजय शिवतारे म्हणाले की, बारामतीपेक्षा जास्त लीड पुरंदरमधून मिळालं पाहिजे. भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालं असून आम्ही प्रचंड ताकदीने दौरे एकत्रित करत, लोकांना समजावत अजित पवारांना १९९१ साली बारामतीपेक्षा जास्त लीड दिले होते. त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला यंदाच्या निवडणुकीत करायची आहे. बारामतीत समसमान मते होतील, पण पुरंदरमध्ये बारामतीपेक्षा जास्त लीड आम्ही देऊ असं त्यांनी सांगितले.

Advertisement

येत्या काळात मुख्यमंत्री शिंदे यांनी रखडलेला गुंजवणीचा प्रकल्प लवकरच सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या काळात तालुक्यातील सर्व कामे मार्गी लागणार आहेत. त्याशिवाय तीन उपसा सिंचन योजना सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते आहे. त्यामुळे तालुक्यातील विकास कामासाठी ते निधी कमी पडू देणार नाहीत, त्यामुळे चिंता करण्याचे कारण नसल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले. आमची दुश्मनी लोकांनी पाहिली आता दोस्तीही बघा, विमानतळ जमीन अधिग्रहणासाठी स्वेच्छा खरेदी दर द्या. समृद्धी महामार्गाच्या निर्माणावेळी एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री म्हणून जी किमया केली. ३ महिन्यात ७७१ एकर जमीन अधिग्रहण केली तशीच आता करावी असं विजय शिवतारेंनी म्हटलं.

दरम्यान, मी लढत होतो, तेव्हा मला सपोर्ट करणारे होते. परंतु मी जेव्हा थांबलो तेव्हा माझ्याविरोधात बोलले. मला खोक्यांची गरज नाही. गावागावातून ज्यापद्धतीने संपूर्ण लोक पेटून उठले होते, पुरंदर एक झाला होता. जेव्हा मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. त्यानंतर संघर्ष करून जे मिळणार होते, तहात मिळाले. जे तुम्ही मला सांगितले तेच पुरंदर, सासवडच्या जनतेला सांगावं यासाठी हा मेळावा घेतला. माझा अजितदादांवर प्रचंड राग होता. बोलता बोलता अनेकदा चुका होतात. प्रचंड रोष दादा होता, बापू आम्ही ऐकणार नाही, नोटाला मतदान करू पण इतर ठिकाणी नाही असं जनता बोलत होती. तरीही तुम्ही इथं येऊन शब्द स्वाभिमानी जनतेला द्यावा. त्यातून सकारात्मक लाट येईल असेही शिवतारे यावेळी बोलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page