सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र कचरे यांनी हिंजवडी येथे मतदार ओळख चिट्ठीचे वितरण करताना साधला नागरिकांशी संवाद
हिंजवडी : बारामती लोकसभा मतदासंघाकरीता येत्या ७ मे रोजी निवडणूक होणार असून मतदारसंघातील सर्व मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे, याकरीता प्रशासनाच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहे. मतदारसंघात आतापर्यंत एकूण १७ लाख १० हजार ८४५ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली आहे.
भोर विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार सहायक निवडणूक अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या हस्ते आज शुक्रवारी(दि. ३ मे) हिंजवडी येथील ब्ल्यु रिड्ज गृहनिर्माण सोसायटी येथील मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्यात आले. परिसरातील नागरिकांशी संवाद साधून निवडणूक प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच येत्या ७ मे रोजी मतदान करण्याबाबत राजेंद्र कचरे यांनी आवाहन केले आहे.
भोर विधानसभा मतदारंसघात एकूण ५६१ मतदान केंद्रावर ४ लाख ७ हजार ९२१ मतदार ओळख चिठ्ठींपैकी ३ लाख ६५ हजार १७१ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ५६१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
बारामती विधानसभा मतदारंसघात एकूण ३८० मतदान केंद्रावर ३ लाख ६९ हजार २१७ मतदार ओळख चिठ्ठीपैकी २ लाख ८७ हजार २७७ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ३८० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे
पुरंदर विधानसभा मतदारसंघात एकूण ४२१ मतदार केंद्रावर ४ लाख २९ हजार ३५१ मतदार ओळख चिठ्ठींपैकी २ लाख ५१ हजार ४७१ मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप करण्यात आले आहे. याकरीता एकूण ५६५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारंसघात एकूण ३३० मतदान केंद्रावर आज रोजीपर्यंत ३ लाख २३ हजार ५४१ मतदार ओळख चिठ्ठीपैकी २ लाख १५ हजार ७६२ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ३३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
दौंड विधानसभा मतदारंसघात एकूण ३०९ मतदान केंद्रावर आज रोजीपर्यंत ३ लाख ४ हजार ६०७ मतदार ओळख चिठ्ठींपैकी २ लाख ६७ हजार ४२३ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ३०९ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
खडकवासला विधानसभा मतदारंसघात एकूण ४६५ मतदान केंद्रावर ५ लाख ३८ हजार ३१ मतदार ओळख चिठ्ठींपैकी ३ लाख २३ हजार ७४१ मतदार ओळख चिठ्ठीचे वितरण करण्यात आले आहे. याकरीता ५१५ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
मतदारसंघनिहाय मतदार ओळख चिठ्ठी वितरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून लवकरच ते काम पूर्ण करण्यात येईल. मतदार ओळख चिठ्ठीचे घरोघरी वाटप करण्यात येत असून मतदारांनी याकामी आपल्या दारापर्यंत येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती द्विवेदी यांनी केले आहे.