भोंगवली येथे भुरट्या कॉपर केबल चोरांचा सुळसुळाट…
पुन्हा एकदा त्याच ठिकाणाहून भोंगवलितील शेतकऱ्यांच्या केबल चोरीची घटना…
सारोळा : भोंगवली (ता. भोर) येथील देवडजाई लघुपाटबंधाऱ्यातील अनेक शेतकऱ्यांच्या वायरी चोरण्याचा धडाका अज्ञात चोरट्यांनी लावला आहे. या मुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या वायरी तसेच मोटारी चोरीला जाऊ नये यची चिंता लागली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
शेतकऱ्याच्या कॉपर धातू तारांच्या वायरी असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक जुगाड मिळत असल्याने परिसरातील अज्ञात भुरट्या चोरांनी रात्रीच्या आधाराचा फायदा घेत दि.५ रोजी चोरी केल्याची घटना झाली.
भोंगवली येथील शेतकरी श्रीकांत गुलाब निगडे (वय ३५) यांची चार हजार दोनशे रुपयांची ७० मीटर कॉपरपट्टी केबल,विजय माधवराव निगडे (वय ६५) यांची चार हजार आठशे रुपयांची ८० मीटर केबल,महादेव सीताराम सुर्वे (वय ५८) यांची चार हजार दोनशे रुपयांची ७० मीटर केबल,जयसिंग माधवराव निगडे (वय (७०) यांची चार हजार आठशे रुपयांची ८० मीटर केबल, दत्तात्रेय सुर्वे (वय ४२) यांची चार हजार दोनशे रुपयांची ७० मीटर केबल आणि सुहास शंकर सुर्वे (वय ५८) यांची चार हजार दोनशे रुपयांची ७० मीटर केबल, यांची शासकीय मूल्यांकनाची एकूण २६ हजार ४०० रुपयांची केबल चोरीला गेली आहे.
या बाबत वरील सर्व शेतकऱ्यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
भोंगवली,न्हावी,राजापूर, टापरेवाडी परिसरातील अश्या अनेक शेतकऱ्यांच्या कॉपर वायर चोरीला गेल्याच्या अनेक घटना आहेत.आज तागायात या सर्व सामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही .या अज्ञात भुरट्या चोरांचा राजगड पोलीस सुगावा कसा लावणार या बाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक चर्चा आहे.